भारताचे नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?www.marathihelp.com

भारताचे नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?
प्रधानमंत्री याचे अध्यक्ष असून एक नेमलेले उपाध्यक्ष असतात ज्यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा असतो.

भारतीय नियोजन आयोग किंवा योजना आयोग, इ.स. १९५० मध्ये स्थापन झालेली भारत सरकारची एक संस्था आहे जिचे प्रमुख कार्य पंचवार्षिक योजना तयार करणे हे होते. १ जानेवारी २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योजना आयोग बरखास्त करून नीती आयोगाची स्थापना केली.

भारतीय नियोजन आयोग जबाबदाऱ्या :

देशातील संसाधनांचा अभ्यास करणे.
या संसाधनांचा प्रभावी आणि संतुलित वापर करण्यासाठी पंचवार्षिक योजना तयार करणे.
प्राथमिक गरजा समजून घेणे, आणि योजनांसाठी संसाधने पुरविणे.
योजना व्यवस्थित चालवण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री पुरविणे.
योजनांच्या प्रगतीचा नियमित काळाने आढावा घेणे.
आर्थिक विकासात बाधा टाकणाऱ्या गोष्टी शोधणे

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 15:39 ( 1 year ago) 5 Answer 5905 +22