भाषेची किती प्रकार आहे?www.marathihelp.com

भाषेचे प्रकार - Types of languages

संस्कृत, लॅटिन या प्राचीन भाषा मूळ भाषा आहेत. या भाषांतून अनेक भाषा निर्माण झाल्या. भारतात संस्कृत या मूळ भाषेपासून हिंदी, मराठी यांसारख्या भाषा निर्माण झाल्या. अशा प्राचीन मूळ भाषांना अभिजात भाषा (Classical language) असे म्हणतात.

ज्या भाषा प्राचीन काळात प्रचलित होत्या पण आधुनिक काळात दैनंदिन व्यवहारात त्या वापरल्या जात नाहीत अशा भाषांना प्राचीन भाषा म्हणतात. पाली, प्राकृत, अर्धमागधी इत्यादी भाषांचा समावेश आपणास प्राचीन भाषांत करता येईल.

लहान मूल ज्या घरात जन्माला आले असेल त्या घरात बोलत्या जाणाऱ्या भाषेचा संस्कार त्या बालकावर अगोदर होतो. अशी भाषा विनासायास त्याच्या कानावर पडते व अनुकरणाने त्याला शिकता येते. ती भाषा त्या बालकाची मातृभाषा होय.

मातृभाषेतून आपण विचार करीत असतो. परकीय देशांत बोलल्या जाणाऱ्या भाषा म्हणजे परकीय भाषा होत. परकीय भाषा शिकणे ऐच्छिक असते. 

कोणत्याही भाषेचा वापर केला जात असताना त्या भाषेच्या उपयोगात त्याच्या व्यक्तिगत लकबिचा मोठा वाटा असतो. भाषा बोलताना उच्चारले जाणारे स्वर भिन्न भिन्न असतात. भाषा बोलताना लयीत फरक असतो. या भाषेला व्यक्तिबोली असे म्हणतात.

विस्तृत भूप्रदेशावर पसरलेल्या भाषेस तेथील स्थानिक परिस्थितीनुसार काही वैशिष्ट्ये प्राप्त होतात. मराठी भाषा विस्तृत प्रदेशावर बोलली जात असताना कोकणी, अहिराणी, खानदेशी, कोल्हापुरी, वऱ्हाडी अशा बोली निर्माण झाल्या अशा भाषांचा समावेश बोलीभाषेत (Dialect) होतो. मराठी भाषेप्रमाणे हिंदी भाषेच्या खडी, व्रज, अवधी अशा अनेक बोलीभाषा आहेत. विविध बोलीभाषांपैकी एका बोलीस राजकीय तसेच सामाजिक कारणामुळे महत्त्व प्राप्त होते.

अशा भाषेला शिक्षणक्षेत्रात व सामाजिक व्यवहारात प्रमुख स्थान मिळते. अशा भाषेस प्रमाणित भाषा ( Standard language) असे म्हणतात.

सरकारी कारभारात वापरण्यात येणाऱ्या भाषेस राजभाषा असे म्हणतात. एखादे राष्ट्र विशिष्ट भाषांना राष्ट्राची भाषा म्हणून घोषित करते त्यावेळी त्या भाषांना राष्ट्रभाषा असे संबोधले जाते. महाराष्ट्रात मराठी या भाषेला राजभाषेचा दर्जा आहे तर भारताची हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. संपूर्ण जगात जास्तीत जास्त उपयोगात येणाऱ्या भाषेस जागतिक भाषा म्हणतात.

राष्ट्राराष्ट्रांत ज्या भाषांचा उपयोग केला जातो त्या आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून ओळखल्या जातात. इंग्लिश, फ्रेंच, रशियन, चिनी या आंतरराष्ट्रीय भाषा आहेत. राज्य सरकारे व केंद्र सरकार आपापसातील व्यवहारासाठी ज्या भाषांचा वापर करतात त्या भाषांना

संपर्क भाषा (Link language) असे म्हणतात. भारतात इंग्लिश व हिंदी या संपर्क भाषा म्हणून ओळखल्या जातात. असे भाषांचे विविध प्रकार आहेत

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 12:05 ( 1 year ago) 5 Answer 3873 +22