मनोविश्लेषणवादाचे जनक कोण * 1 point?www.marathihelp.com

मनोविश्लेषण : सिग्मंड फ्रॉइड (१८५६-१९३९) यांनी मांडलेल्या मानवी मनाविषयीच्या सिद्धांतप्रणालीला आणि मानसोपचार पद्धतीला मनोविश्लेषण ही संज्ञा वापरली जाते मनोविश्लेषण म्हणजे, फ्रॉइड यांच्या सिद्धांतचौकटीला धरून केलेले मनाचे अन्वयन आणि स्पष्टीकरण. मानशास्त्रीय विचाराचा आवाका वाढवण्याचे आणि सखोल करण्याचे काम फ्रॉइड यांनी केले. त्यामधून एक स्वतंत्र संप्रदायही अस्तित्वात आला. फ्रॉइडपासून आजतागायत या संप्रदायातही अनेक वळणे येऊन गेली.

मानवी मनोव्यवहाराच्या विश्लेषणाचा आरंभ जरी फार प्राचीन असला, तरी एकोणिसाव्या शतकातील वैज्ञानिक विचाराची प्रगती अभूतपुर्वच होती. मानसशास्त्रात ती दोन प्रकारे जाणवली : एक म्हणजे भौतिक विज्ञानाची वस्तुनिष्ठ आणि सार्वत्रिक पद्धती स्वीकारून व्हुंट यांनी सुरू केलेले प्रायोगिक मानसशास्त्र व दुसरा प्रकार म्हणजे मानवाच्या समग्र आकलनासाठी मूलतत्वांची व संकल्पनांची चौकट मांडणारे

मनोविश्लेषणवादी सिद्धांत. या सिद्धांताची व्यवस्थित मांडणी आणि सर्व मानवी वर्तनाला कवेमध्ये घेण्याची त्याची क्षमता या दोन वैशिष्यांमुळे फ्रॉइड हे विसाव्या शतकातील सर्वात महत्वाचे मानसशास्त्रज्ञ गणले जातात. त्यांच्या नंतरच्या प्रत्येक मानसशास्त्रज्ञाला त्यांची दखल घ्यावीच लागली. ही प्रणाली मानणारे, ह्या प्रणालीस पुर्णपणे टाकाऊ समजणारे आणि या प्रणालीला आपापल्या परीने वळण लावणारे अशा तीन वर्गात फ्रॉइड यांच्या नंतरच्या मानसशास्त्रज्ञांची विभागणी करता येईल. साहित्य, कला, धर्म, पुराणकथा, संस्कृती, सर्वसामान्य वर्तन, विकृतवर्तन या सर्वच प्रश्रांवर फ्रॉइड यांनी काही मूलतत्वांच्या आधारे नवा प्रकाश टाकला.

मनोविश्लेषणवादी विचाराने धर्म, नीती, आध्यात्मिक उन्नतीचे मार्ग या क्षेत्रांसमोर एक नवा प्रश्र उभा केला. कारण मानवी मनोरचनेची बैठक ईश्वरनिरपेक्ष सहजप्रवृत्ती व चैतन्यशक्ती यांच्या आधारे मांडून मनोविश्लेषणवादाने सृष्टिनियमाचा शोध घेण्याची वैज्ञानिक पद्धती अंगीकारली. यातून मूल्यसंकल्पना त्रिकालाबाधित, की संस्कृतिसापेक्ष, हा प्रश्र घसाला लावायला मदत झाली आणि आध्यात्मिक उन्नती ही उन्नती आहे, एखाद्या विकृतीचे उदात्तीकरण आहे, हा अस्वस्थ करणारा प्रश्र उत्पन्न झाला.

मनोविकृतिग्रस्त, गुन्हेगार, कलावंत अशा वेगळ्या माणसांच्या वेगळेपणाचा अन्यवही मनोविश्लेषणाच्या चोकटीत लावून दाखवतायेत असल्यामुळे, त्यामागे काही अनाकलनीय ईश्वरी वा दिव्य संकेत असतात, या समजुतीलाही तडा गेला.

या प्रकारे पापपुण्य, दैवी लेणे, त्रिकालाबाधित मूल्ये या सर्वच गोंष्टीबाबत मूलभूत प्रश्र नव्याने मांडणारा हा सिंद्धांत काहींना पाखंडी, मूर्तिभंजक वाटला, तर काहींना सत्यान्वेषी विचाराचा अग्रदूत मासला. मनोविश्लेषणवादाला कडवे समर्थक व कट्टर विरोधक मिळाले आहेत.

मानसशास्त्रज्ञांमध्येही समर्थक व विरोधकांच्या फळ्या उभ्या राहिल्या. मनोविश्लेषणवादी संकल्पनांनी मानसशास्त्राचे काम अंतिम टप्प्यावर आणले असे मानणारे समर्थक त्याच्या उपयोजनाच्या मागे लागले, तर विरोधक त्याची बैठकच नाकारून मापनाधिष्ठित सिद्धांताचे प्रतिपादन करू लागले आणि या सार्‍यातूनच या सिद्धांतप्रणालीच्या संबंधात प्रायोगिक अभ्यासही सुरू झाला.

विसाव्या शतकातील विचारमंथनात मनोविश्लेषणवादाचा स्पष्ट सूर मानसशास्त्र, सौंद्रर्यशास्त्र, साहित्य, कलासमीक्षा या सर्व प्रांतांत ऐकू येतो.

पार्श्वभूमी : वैद्यकीय ज्ञान आणि मानसशास्त्र या दोहोंतील संगमभूमी ही फ्रॉइड यांच्या कामाचे आरंभश्थान होय. त्यावेळी जाणिवेचे विश्लेषणात्मक मानसशास्त्र ⇨व्हिल्हेल्म व्हुंट (१८३२-१९२०) यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठीय स्तरावर विकास पावत होते, त्यावेळीच वैद्यकीय क्षेत्रात मज्जाविकृतीवरील चिकित्सेच्या निमित्ताने एक नवीन द्दष्टिकोन अस्तित्वात आला होता. पॅरिस येथे ⇨झां मार् त शार्को (१८२५-९३) संमोहनाचा अवलंब करून ओऔन्मादिक विकृतीवर चिकित्सा करीत होते. नॅन्सी शहरी बर्नहाईम हेही मनोमज्जाविकृतींवर संमोहनचिकित्सा करीत होते. मनोविकृतींना शारीरिक स्वरूपाचीचकारणे असतात हा केवळ शरीरवादी द्दष्टिकोन असमाधानकारक ठरू लागला होता. कारण, काही मनोविकृतींच्याबाबतीत कोणतेच शारीरिक कारण आढळून येत नव्हते. साहजिकच, कमजोर इच्छाशक्ती, मानसिक ताण-तणाव, सूचनवशता, अयोग्य सवयी इ. गोष्टी विचारात घेण्यात येऊ लागल्या होत्या. संमोहित अवस्थेत रूग्‍णास सूचना देऊन त्याची औन्मादिक लक्षणे दूर करता येतात, असे ⇨प्येअर झाने (१८५९-१९४७) यांनाही आढळले होते. या सर्व गोष्टीच्या ऊहापोहातून जाणिवेचे स्तर आणि मानसोद् भव शारीरव्याधी या दोन संकल्पना आकारू लागल्या होत्या.

मनोविकृतीवरील उपचाराच्या द्दष्टीने संमोहन ही पद्धती फ्रॉइड यांनी शार्को यांच्याकडे जाऊन अभ्यासली. ⇨ योझेक ब्रॉइअर (१८४२-१९२५) यांनी संमोहनावस्थेतील भावविरेचनाचे तंत्र वापरून उन्मादलक्षणे बरी करण्यात यश मिळविले फ्रॉइड आणि ब्रॉइअर यांनी या तंत्राचा अधिकाधिक वापर करून स्टडीज इन हिस्टेरिया हा ग्रंथ प्रसिद्ध केला (१८९३-९५).

परंतु संमोहनावरस्थेत ज्या स्मृती व भावना व्यक्ती सहज शब्दांकित करू शकते त्या जागेपणी कोठे असतात. त्या शब्दरूप का घेऊ शकत नाहीत, या संकल्पनात्मक प्रश्रांबरोबरच संमोहनचिकित्सेच्या काही मर्यादाही लक्षात येऊ लागल्या होत्या एक तर, काही रूग्ण संमोहित होत नसत. खाजगी रूग्णांच्या बाबतीत संमोहनचिकित्सा फारशी यशस्वी होत नाही, असे ही फ्रॉइड यांना नॅन्सी येथे कळले होते (१८८९). तिसरी गोष्ट म्हणजे संमोहनचिकित्सा ही चिकित्सकव रूग्ण यांच्या व्यक्तिसापेक्ष अशा संबंधांवर अवलंबून असते. ब्रॉइअरप्रमाणेच फ्रॉइड यांच्या अनुभवास असेही आले, की संमोहनाद्वारे बर्‍या होऊ लागलेल्या रूग्ण स्त्रीच्या भावना व अभिवृत्ती चिकित्सकाकडे वळू लागतात व हे संक्रमण (ट्रान्सफरन्स) योग्य आणि व्यवस्थित रीत्या हाताळणे संमोहनपद्धतीमध्ये कठीण जाते. संमोहनपद्धतीने झालेली सुधारणाही तात्पुरतीच ठरे, दुसरेच एखादे विकृतिलक्षण द्दग्गोचर होऊ लागे. म्हणून वरील उणिवा नसलेली व विकृती समूळ नाहीशी करू शकेल अशी पद्धती फ्रॉइड यांना आवश्यक वाटू लागली. तू जागा झाल्यानंतर तुला हे सर्व आठवू शकेल अशी सूचना संमोहित अवस्थेत देऊन ठेवली, तर रूग्णास ते सर्व आठवू लागते ही गोष्ट फ्रॉइड यांनी नॅन्सी येथे पाहिली होती. तेव्हा, जागृत अवस्थेत असतानासुद्धा रूग्णास शरीराने व मनाने शिथिल अवस्थेत ठेवले व मनात जे विचार येतील ते येऊ देत म्हणून सांगितले, तर या मुक्त साहचर्य पद्धतीने त्याला एरवी न आठवणार्‍या लहानपणापर्यतच्या प्रसंगापर्यंत पोहचणे शक्य होईल असे त्यांना वाटले.[संमोहनविद्या].

म्हणून ‘भावविरेचन’ याऐवजी ‘मनोविश्लेषण’ ही संज्ञा त्यांनी निवडून स्वत:ची अशी चिकित्सापद्धती आकाराला आणली आणि त्या पद्धतीच्या पायाभूत संकल्पना प्रस्तुत केल्या. या संकल्पना दोन प्रकारच्या आहेत: (१) मनुष्याच्या मानसिक रचनेचे स्वरूप सांगणार्‍या संकल्पना. यामध्ये अबोध मनाचा सिद्धांत,आदिम कामप्रेरणेची (लिबिडो) संकल्पना आणि व्यक्तिमत्वरचनेचा सिद्धांत यांचा समावेश होतो. (२) वर्तनांचे कार्यकारणभाव विशद करणार्‍या संकल्पना. यांमध्ये सहजप्रवृत्ती, प्रेरणांचे द्विध्रुवात्मक स्वरूप, सुखतत्व, व्यक्तिमत्वातील अहं ने निर्माण केलेल्या स्वरक्षक यंत्रणा इत्यादींचा समावेश होतो.

मनुष्याची मानसिक रचना : वर्तनाच्या व मनोव्यापारांच्या उलगड्यासाठी मन ही संकल्पना शरीर यापेक्षा वेगळी कल्पून मनाचे धर्म, मनाचे व्यापार इ. कल्पनांच्या साहाय्याने अनुभवाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न फार प्राचीन काळापासून झालेला आहे. त्यात,मनाची संज्ञाशक्ती किंवा जाणीव, स्वप्न, भास, सुषुप्ती, ध्यान, समाधी यांसारख्या जाणिवेच्या अवस्था ‘आत्मा’ हे सूक्ष्मतम तत्व कल्पून समाविष्ट केल्या जात होत्या.

फ्रॉइड यांनी मन ही संकल्पना तीन स्तरांच्या रूपात मांडली मानवी मनाच्या कक्षा बोधावस्था, बोधपूर्व अवस्था आणि अबोधावस्था अशा तीन थरांत विस्तारलेल्या असतात, हा त्यांचा मुख्य सिद्धांत होय. ज्या मानसिक घटना आमि स्मृती यांची वर्तमानकाळात व्यक्तीला जाणीव असते, तो बोध स्तर होय. याखेरीज स्मृती व इच्छांचे एक भांडार असते. ते सर्वच्या सर्व प्रत्यक्ष जाणिवेत नसते, परंतु सहजपणे उपलब्ध होऊ शकते. हे बोधपूर्व मन. ⇨अबोध मनात खोल गाडलेल्या स्मृती, इच्छा, प्रच्छन्न प्रेरणा दबून राहिलेल्या असतात. या मनाचा काही भाग आदिम स्वरूपाचा, पाशवी विचार आणि वासनांचा बनलेला व केवळ सुखाची इच्छा धरणारा असतो. तो कधीच बोध कक्षेत आलेला नसतो. उरलेल्या अबोध कक्षेत बोधजाणिवेतून हद्दपार केलेल्या धक्कादायक, क्लेशकारक व लज्जास्पद इच्छा, विचार, स्मृती इ. गोष्टींचा कल्लोळ चालू असतो. यामुळे अबोध मनाच्या ठिकाणीही प्रेरक शक्ती असते. अबोध मनाची कक्षा बोध मनाच्या मानाने खूपच विस्तृत असते. म्हणून फ्रॉइड यांनी बोध मनाला हिमनगाचा पाण्यावरील द्दश्य भाग अशी उपमा दिली.

बोध मन आणि बोधपुर्व मन यांच्या आशयात (कन्टेन्ट) आंतरिक सुसंगती असते, कालक्रम आणि बाह्या वास्तव यांच्याशी मिळते घेण्याची क्षमता असते. अबोध मन मात्र कालक्रमनिरपेक्ष, विस्कळित, वालिश क्षमता असते. अप्रगत आणि आदिम असते. त्यातील आशयाला बोध मनात यायला प्रतिबंध होत असतो.

मनाच्या या प्रकारच्या रचनेमुळे, नियत्रंण झुगारू पाहणारे अबोध मन आणि बाह्या वास्तवातील नियमांच्या अंकित असणारे बोध मन व बोधपूर्व मन यांचे सतत द्वंद्व चालू असते. अबोध मन अत्यंत आवेगमय प्रेरणांनी रसरसत असते. त्याला प्रतिंबध होत असला, तरी ते सतत धडका देत असते. भलतेच शब्द अमावितपणे तोंडून देणे, सोईस्कर विस्मरण, कल्पनाशक्तीच्या लीला, स्वप्ने, आंतरिक संघर्ष व अस्वस्थता, मज्जाविकृतीची लक्षणे या सर्व गोष्टी अबोध मनाच्या अस्तित्वाच्या खुणा आहेत. गंभीर चित्तविकृतींमध्ये तर अबोध मनाच्या सर्व भिंती कोसळून तेथील खदखदणारे रसायन थेट अभिव्यक्तीच्या टप्प्यावर प्रवेश मिळविते.

अबोध मनाच्या या वैशिष्यांच्या निर्मिती करणार्‍या ह्या शक्तीसाठी लिबिडो ही संज्ञा फ्रॉइड यांनी वापरली. लिबिडी वा कामप्रेरणा या शक्तीचे रूपच कामुक आहे, ही संकल्पना प्रस्तुत करून मानवी मनोरचनेचे इतर सर्व आराखडे फ्रॉइड यांनी कोलवून टाकले. मुळातील चैतन्यशक्ती ही सर्वव्यापी तर खरीच, पण तीच कामुक, लैंगिकही आहे असे म्हटल्याने सर्व कृती, वयाच्या सर्व अवस्थांतील वर्तनाचा तपशील, उन्नतीची सर्व धडपड हे सारे काही कामुकतेचे आविष्कार बनले. कामप्रेरणा ही संकल्पना फर्इड यांनी एकाच वेळी अत्यंत व्यापक केली आणि ती ठामपणे शारीर अशा रूपातही मांडली.त्यामुळे त्यांचा धिक्कार झाला. तरीपण सर्व शरीरव्यापारांतून, इच्छापूर्तींतूनउपभोगातून जे काही सुख मिळते ते कामकुच वा कामप्रेरणारूपच असते, ही मूळ कल्पना सोडून न देता व्यक्तीचा मानस-लैंगिक विकास कोणते टप्पे घेत घेत होतो, हेही फ्रॉइड यांनी विशद केले.

बालकांच्या लैंगिकतेचा विकासक्रम व तिच्याशी संबंधित असलेल्या बालकांच्यामानसिक जीवनातील घटनांचा क्रम फ्रॉइड यांनी वर्णन केला आहे, तो असा: पहिल्या वर्षी बालकाची लैंगिकता ओष्ठ व मुखकेंद्रित असते. दूध पिताना किंवा भूक नसतानादेखील बोट, बूच चोखून, वस्तू चावत राहून मूल ओष्ठस्पर्शसुख मिळवीत असते.ही त्याच्या लैंगिकतेची मुखकेंद्रित (ओरल) अवस्था होय. तिसर्‍या वर्षाच्या सुमारास मलविसर्जनाच्या क्रियेततसेच मल रोखून धरण्यात व तज्जन्य संवेदन अनुभवण्यात मुलाला आनंद वाटू लागतो. ही गुदकेंद्रित ( ॲनल) अवस्था होय. चौथ्या वर्षाच्या सुमारास मूल मूत्रोत्सर्गाच्या वेळचे सुख अनुभवू लागते तसेच हळूहळू स्वत: च्या जननेंद्रियाशी चाळा करू लागते. ही बालकाची लैंगिकतेची अननेंद्रिये वा लिंग केंद्रित (जेनिटल) अवस्था होय. स्वत:च्या शरीरात रममाण होण्याची बालकाची ही प्रवृत्ती स्वत:चे प्रतिबिंब पाहून स्वत:वरच प्रेम करू लागलेल्या नार्सिसस ची आठवण करून देते. म्हणून स्वत:च्याच शरीरापासून सुख मिळणार्‍या ह्या आत्मरतिपर लैंगिकतेस फ्रॉइड यांनी नार्सिसझम म्हटले आहे. [“आत्मरति].

तीन ते सहा वर्षे या वयात मुलामुलींच्या लैंगिकतेस वेगळी दिशा मिळते. मातापिता हे तिचे विषय बनतात. बालकाच्या मातापित्यांविषयीच्या प्रेमात लैगिक छटा येऊ लागते. संगोपनासाठी म्हणून मुलाला त्यांची असाणारी गरज, स्तनपानाच्या प्रसंगी मातेकडून आणि स्नानादी प्रसंगी मातापित्यांकडून मिळणारे स्पर्शसुख, मातापित्यांच्या वात्सल्याचा भाग म्हणून त्यांच्याकडून मिळणारे चुंबन, आलिंगनादींमुळे मिळणारे उद्दीपन या सर्वांमुळे बालकाला मातापित्यांचे आकर्षण वाटू लागते. याच वयात स्वत:चे उघडे शरीर पाहण्याची प्रवृत्ती, परपीडनाचा आनंद अनुभवण्याची प्रवृत्ती (सॅडिझम), दुसर्‍याकडून दुखवून घेण्यात आनंद अनुभवण्याची प्रवृत्ती (मॅसोकिझम) या प्रवृत्तीही दिसून येऊ लागतात. परंतु मातापित्यांची दटावणी, शरीरातून बाहेर पडलेल्या मलमूत्राची वृणा व नैतिक संस्कार यांमुळे काही प्रवृत्तींचे निरोधन होत असते. [“परपीडन व स्वपीडन विकृति].

ईडिपस गडाचा उद् भव व निरास: तीन ते सहा या वयात मुलामुलींमध्ये मातापित्यांविषयी कोमल प्रीतीभावाबरबरच द्वेष अशी संमिश्र अभिवृत्तीही निर्माण होते. मुलाला मातेविषयी आकर्षण व पित्याविषयी द्वेष वाटू लागतो,तर मुलीला पित्याविषयी आकर्षण व मातेविषयी द्वेष वाटू लागतो, तर मुलीला पित्याविषयी आकर्षण व मातेविषयी द्वेष वाटू लागतो. भिन्नलिंगी व्यक्तीकडे आकर्षित होण्याची अत: प्रेरित प्रवृत्ती, मातेला मुलगा, तर पित्याला मुलगी अधिक आवडते ही गोष्ट, आणि आईकडून हव्या असणार्‍या प्रेमात मुलाला स्व: चा पिता स्पर्धक व पित्याकडून प्रेमात मुलीला ही स्पर्धक वाटते. ह्या गोष्टींचा या प्रकाराशी संबंध असतो.

फ्रॉइड यांनी माणसाचे ⇨व्यक्तिमत्व तीन भागांत विभागले आहे. या भागांना ⇨इदम् किंवा सुप्तात्मा (इड), ⇨अहम् (एगो) आणि श्रेष्ठात्मा किंवा ⇨पराहम् (सुपर एगो) अशी नावे त्यांनी दिली. इदम् किंवा सुप्तात्मा हा अबोध मनाचे प्रतिनिधित्व करणारा भाग. सामान्यपणे माणसातील पशु असे त्याचे वर्णन करता येईल. त्याला तर्क, नियम यांचे वावडे असते. विस्कळित, विसंगत, वास्तवाचा संपर्क नसलेल्या अनेक इच्छा, वासना, विकार या भागात वास करीत असतात. श्रेष्ठात्मा किंवा पराहम् म्हणजे एरव्ही आपण सदसद् विवेकबुद्धी म्हणतो ती [” सदसद् बुद्धि]. याचा काही भाग अबोध मनाचा असतो. नीती, विधिनिपेध, आदर्श यांच्यामार्फत निर्णय व नियत्रंण ही कार्ये तो करतो. अहम् हा व्यक्तिमत्वाचा प्रशासक घटक. त्याचा बराच भाग सबोध आणि काही बोधपुर्व असतो. त्याचा इदम् आणि पराहम् शी संपर्क असतो. (१) शारीरिक पोषण व संरक्षण (२) इदम् चे वास्तवानुरूप नियंत्रण, (३) सामाजिक वास्तवाशी ⇨संघर्ष निर्माण करणार्‍या वासनांचे ⇨निरोधन, (४) इदम् आणि पराहम् यांचा मेळ घालणे इ. मुख्य कामे अहम् पार पाडत असतो.

मनाच्या या रचनेमध्ये गुंतागुंत निर्माण होते ती प्रेरणांच्या द्विध्रुवात्मकतेमुळे कारण, एकूण जैविक शक्ती जीवनाभिमुख प्रेरणांप्रमाणेच मरणाभिमुख प्रेरणांनाही जन्म देते. त्यामुळे एकाच वेळी प्रेम आणि द्वेप, एकाच ठिकाणी विधायक व विध्वंसक वृत्ती, जगणार्‍याची ओढ आणि मरणाचीही ओढ असा प्रकार उत्पन्न होतो. यातून कोणत्या प्रवृत्तींचे प्राबल्य निर्माण होईल त्यानुसार वर्तनास दिशा मिळते.

फ्रॉइड यांच्या या संकल्पनांमुळे माणसाच्या स्वत:विषयीच्या आकलनात भर पडली. आत्मवंचना करून स्वत:सुप्रतिष्ठित प्रतिमा जपत बसण्याचे त्याला कारण उरले नाही, त्याबरोबरच कामप्रेरणेच्या अंकित राहून तिचा धिक्कार करण्यापेक्षा तिचे स्वरूप समजावून घेण्याकडे लक्ष वळवणे शक्य झाले.

वर्तनामागील कार्यकारणभाव : मनुष्य जसा वागतो तसा तो का वागतो या प्रश्रनाचे उत्तर देताना फ्रॉइड यांनी सहजप्रेरणांचा स्वत:च्या चौकटीशी सुसंगत असा सिद्धांत मांडला. व्यक्तिमत्त्वाची रचना कार्यान्वित करणारी तत्वे म्हणजे सहजप्रेरणा. संवेदन, स्मरण, विचार या इतरप्रक्रियांना दिशा मिळते ती या प्रेरणांमुळे. वर्तनाचा रोख आणि विरामस्थान या दोन्हींचे नियंत्रण सहजप्रेरणा करतात. सहजप्रेरणांची ऊर्जा शारीरिक गरजांमधून निर्माण होते. शरीरातील कमतरता भरून निघाली, की सहजप्रेरणेचे ध्येय साध्य होते. या व्यवहारात इतर काही दुय्यम साध्ये उत्पन्न होतात. अंतिम साध्यांना फ्रॉइड यांनी आंतरिक साध्ये म्हटले, तर दुय्यम साध्यांना त्यांनी बाह्या साध्ये म्हटले. शरीरांतर्गत उणिवेमुळे ताण व ध्येयप्राप्तीमुळे विराम, असे हे चक्र चालते. ताण नाहीसा होण्याने मिळणारा आनंद तीव्रतर करण्यासाठी मनुष्य काही वेळा ताण वाढवण्याचा मार्गही आधी स्वीकारतो. आवर्तन, पुनरावर्तन आणि सुखसाधन हे सहजप्रेरणांचे विशेष असतात.

सहजप्रेरणा व्यक्तिमत्वाच्या इदम् मधून उद् भवतात. इदम् हे ऊर्जेचे भांडार आहे, त्यातून सतत वेगवेगळ्या व्यवहारांना लागणाऱ्याऊर्जेचा पुरवठा होत असतो. त्याचा वापर अहंच्या निर्मितीसाठीही होतो.फ्रॉइड यांच्या सिद्धांतात सहजप्रेरणांचे दोन वर्ग सांगितलेले आहेत. एक वर्ग जीवनाभिमुख प्रेरणांचा आणि दुसरा मरणाभिमुख प्रेरणांचा. जीवनाभिमुख प्रेरणांमध्ये ‘अहम्’ मधून येणार्‍या प्रेरणा आणि ‘लिबिडो’ मघृन येणार्‍या प्रेरणा असे दोन वर्ग फ्रॉइड यांनी सांगितले: ‘अहं’ प्रेरणा जीवरक्षणात्मक, वास्तव तत्वाशी बांधलेल्या, तर लिबिडा-प्रेरणा जातिरक्षणात्मक, परंतु प्रेमविषयाशी बांधलेल्या, सुखतत्वाने भारलेल्या. मरणाभिमुखतेचे मुख्य रूप आक्रमण प्रवृत्ती. या प्रेरणाविषयक सिद्धांताचे खालील तत्त्कावरून समजून येईल.

solved 5
General Knowledge Tuesday 11th Oct 2022 : 11:38 ( 1 year ago) 5 Answer 410 +22