महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत 2022?www.marathihelp.com

महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी आहेत.

भगतसिंग कोश्यारी ( १७ जून १९४२) हे एक भारतीय राजकारणी व महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आहेत. ते मे १९९७मध्ये ते उत्तर प्रदेश राज्याच्या विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले. ते भारतामधल्या उत्तराखंड राज्याच्या राजकारणातील एक प्रमुख लोकनेते होते. उत्तराखंडमधील भारतीय जनता पक्षाचे सदस्य ते पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असा त्यांचा पक्षातील प्रवास आहे. ते भाजपच्या उत्तराखंड विभागाचे पहिले प्रदेशाध्यक्ष होते. उत्तराखंड राज्याच्या निर्मितीनंतर तेथील पहिल्या मंत्रिमंडळामध्ये ते २००० ते २००१ या काळासाठी ऊर्जा, पाटबंधारे, जलसिंचन, न्याय व विधिमंडळ कामकाज मंत्री झाले. सन २००१ ते २००२ या कालावधीसाठी ते उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री होते. तसेच २००२पासून ते २००७पर्यंत उत्तराखंड विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. २००८मध्ये ते भारताच्या राज्यसभेचे सदस्य म्हणून उत्तराखंडमधून निवडून गेले. त्यानंतर सन २०१४ साली ते नैनीताल-उधमसिंहनगर(काशीपूर )लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.[१] भगतसिंग कोश्यारी यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेशी जवळीक आहे. इंदिरा गांधी यांनी भारतावर लादलेल्या आणीबाणीला विरोध केल्यामुळे सन १९७५ ते १९७७ या कालावधीत कोश्यारींना तुरुंगवास भोगावा लागला. ५ सप्टेंबर २०१९ रोजी त्यांची नियुक्ती महाराष्ट्राच्या राज्यपालपदी झाली.

solved 5
राजनीतिक Tuesday 11th Oct 2022 : 11:26 ( 1 year ago) 5 Answer 263 +22