मुघलांनी अंतर्गत व बाहय शत्रूंपासून संरक्षण मिळवण्यासाठी मराठ्यांची कधी तह केला?www.marathihelp.com

मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते. त्याच्या जवळपासचा प्रदेश मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता; परंतु या प्रदेशावर मराठयांची घटट् पकड असल्यामुळे इंग्रजांचे फावले नाही. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी राज्यावर दोन आपज्ञ्ल्त्;ाी कोसळल्या. १७६१ च्या पानिपतच्या युध्दात झालेली प्रचंड हानी व कर्तृत्ववान पेशवा माधवराव यांचा मृत्यु यांमुळे मराठी सज्ञ्ल्त्;ाा दुबळी झाली माधवरावाच्या मृत्युनंतर त्याचा चुलता रघुनाथराव याला पेशवेपद हवे होते पण त्यास अनेक मराठी सरदारांचा विरोध होता. यामुळे मराठयांमध्ये दुफळी माजली. रघुनाथरावाने इंग्रजांची मदत मागितली. इंग्रज व रघुनाथराव यांच्यामध्ये सुरत येथे करार झाला. अशा रीतीने मराठयांच्या राजकारणात इंग्रजांचा शरकाव झाला.
सन १७७५ ते १८१८ या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यात तीन युध्दे झाली. सन १७७५ ते १७८२ च्या पहिल्या युध्दात बहुतेक सर्व मराठी सरदांनी एकजुटीने इंग्रजांना तोंड दिले. त्यामुळे मराठयांची सरशी झाली. १७८२ साली सालबाईचा तह होऊन पहिले मराठांग्रज युध्द संपले.
सन १७९८ मध्ये र्लॉड वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला. सर्व भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे त्याचे धोरण होते. त्यासाठी त्याने अनेक भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजचे करार केले. या करारांन्वये भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीने आश्वासन देण्यात आले. मात्र त्यासाठी काही अटी घातल्या. भारतीय राज्यकत्र्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावे, त्या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढया उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यावा, इतर सत्ताधीशांशी त्यांनी इंग्रजांच्या मध्यस्थीनेच संबंध ठेवावेत, एकमेकांशी प्रत्यक्ष वाटाघाटी करू नयेत, सर्व बोलणी इंग्रजांच्या मध्यस्थीनेच करावीत, इंग्रजांचा रेसिडेंट आपल्या दरबारी ठेवावा अशा त्या अटी होत्या. तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय सत्ताधीश निजाम हा होता. यानंतर काही इतर सत्ताधीशांनीही ही पद्धत स्वीकारली व आपले स्वातंत्र्य गमावले.
सन १८०२ मध्ये पेशवा दुसरा बाजीराव याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. हा करार वसईचा तह म्हणून प्रसिध्द आहे. परंतु हा तह शिंदे व भोसले या मराठी सरदारांना मान्य नव्हता. यातून १८०३ साली दुसरे इंग्रजाराठा युध्द झाले. या युध्दात इंग्रजांनी शिंदे व भोसले यांचा पराभव केला. १८०५ साली होळकरही पराभूत झाले. या पराभवांमुळे उत्तर भारतातील दिल्ली, आग्रा या महत्वाच्या केंद्रांवरील मराठयांचा प्रभाव नष्ट झाला व त्यांची जागा इंग्रजांनी घेतली. या विजयानंतर इंग्रजांचा मराठी राज्यात हस्तक्षेप सतत वाढू लागला. तो असहय होऊन १८१७ साली बाजीरावाने इंग्रजांविरुध्द युध्द पुकारले. या युध्दात पेशव्याचा पराभव झाला. सन १८१८ मध्ये बाजीरावाने शरणागती पत्कारली. अशा प्रकारे इंग्रज हे भारतातील प्रमुख सत्ताधीश बनले.

solved 5
General Knowledge Monday 10th Oct 2022 : 16:16 ( 1 year ago) 5 Answer 39 +22