वर्चस्व सिद्धांत म्हणजे काय?www.marathihelp.com

ग्राम्सीने वर्चस्व आणि धुरीणत्व यांतील भेद स्पष्ट केला आहे. अधिशास्ता वर्ग कठोरपणे दुसऱ्या वर्गावर गुलामगिरी लादतो व आपले अधिशासन स्थिर करतो. अशा वेळी तेथे ‘वर्चस्व’ नांदत असते. दक्षिण आफ्रिकेत गोऱ्यांनी काळ्यांवर प्रस्थापित केलेले वर्चस्व हे या प्रकारात मोडते; मात्र जेव्हा वर्चस्व कठोरपणे व आदेशात्मक पद्धतीने न लादता चातुर्याने व सर्वसंमतीचे वातावरण निर्माण करून लादले जाते तेव्हा तेथे ‘धुरीणत्व’ असते. येथे गुलामगिरी लादली जात नाही पण अप्रत्यक्षपणे ‘संमती’ लादली जाते.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 14:22 ( 1 year ago) 5 Answer 15585 +22