व्होल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाच्या जनक असे का म्हटले जाते?www.marathihelp.com

व्होल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाच्या जनक असे का म्हटले जाते?

यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाज परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती याचाही विचार करावा असे विचार करून मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा असे व्हाॅलटेअर यांनी मांडले. म्हणून व्हाॅलटेअर यांना आधुनिक इतिहासलेखनाचे जनक म्हणतात.

व्हाल्टेअर (नोव्हेंबर २१, इ.स. १६९४ - मे ३०, इ.स. १७७८) हा एक फ्रेंच लेखक, कवी व तत्त्वज्ञ होता. व्हॅाल्टेअरने नवलकथा, निबंध, नाटके, कविता, ऐतिहासिक, शास्त्रीय असे चौफेर लेखन केले व त्यातून त्याने फ्रान्समधील अनियंत्रीत राजेशाही, स्वार्थी धर्मगुरू व विलासी उमराव यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. 'कॅन्डिड' हा त्याचा विशेष प्रसिद्ध ग्रंथ आहे. त्याने एकूण २,००० पुस्तके तसेच २,००० पेक्षा अधिक पत्रे लिहिली. त्याचे ललित लेखन उपरोधिक असे. लोकांच्या मनातील सुप्त भावनांना शब्दरूप करण्याचे महत्त्वाचे कार्य व्हॅाल्टेअरने केले. फ्रांसमधील विषम समाजव्यवस्थेवर त्याने कडक टिका केली. तो लोकशाहीचा पुरस्कर्ता नव्हता. व्यक्तिस्वातंत्र्याचा व राजेशाहीचा पुरस्कर्ता होता. शंभर उंदरापेक्षा एका सिंहाचे राज्य केव्हाही श्रेष्ठ होय. असे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे त्याला दोनदा तुरूंगात टाकण्यात आले. तसेच फ्रांसमधून हद्दपार सुद्धा करण्यात आले. त्याच्या विचारामुळे लोकजागृती होऊन, लोक जुलूम व अन्यायाच्या विरुद्ध बंड करण्यास प्रवृत्त झाले.व्हॉल्टेअरचे मूळ नाव फ्रान्स्वा मरी अरूए असे होते . व्हॉल्टेअर या फ्रेंच तत्त्वज्ञाने इतिहासलेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा , व्यापार , आर्थिक व्यवस्था , शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे , हा विचार मांडला . त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा , हा विचार पुढे आला . त्या दृष्टीने व्हॉल्टेअर आधुनिक इतिहासलेखनाचा जनक होता असे म्हणता येईल .

solved 5
ऐतिहासिक Wednesday 7th Dec 2022 : 13:00 ( 1 year ago) 5 Answer 5673 +22