सकारात्मक दृष्टीकोन म्हणजे काय?www.marathihelp.com

सकारात्मक दृष्टीकोन म्हणजे काय?

अर्ल नाइंटिगेलचे एक प्रसिद्ध वाक्य आहे. तो म्हणतो, 'आपला आयुष्याबद्दलचा दृष्टीकोन आयुष्याचा आपल्याबद्दलचा दृष्टीकोन ठरवत असतो.' एखाद्या वस्तूबद्दलची आवड अथवा नावड म्हणजे दृष्टीकोन, असे शद्बकोश सांगतो. मग ती विचार करण्याची पद्धत असू शकते किंवा देहबोलीही. दृष्टीकोन हे तुमची मन:स्थिती आणि त्यावर अवलंबून असलेला तुमचा तुमच्या भोवतालच्या जगाबद्दलचे मत याचे एक मिश्रण असते. तुम्ही तुमचा भवताल कसा बघता आणि त्यावर भविष्य कसे ठरवता यावर तुमचा दृष्टीकोन ठरत असतो. हा दृष्टीकोन म्हणजे तुम्ही ठरवत असलेला तुमच्या आयुष्याचा फोकस असतो. आपला दृष्टीकोन कसा आहे, यावर आपणे खरे बोलतो की खोटे, कृती करतो की निष्क्रिय राहतो हे ठरत असते.

हा दृष्टीकोनच ठरवतो की आपण यशस्वी होणार की अयशस्वी! दृष्टीकोन सकारात्मक, नकारात्मक किंवा मध्यममागीर्ही असू शकतो. मात्र, केवळ चांगले विचार असणे म्हणजे सकारात्मक दृष्टीकोन नव्हे, हेही लक्षात ठेवायला हवे. कोणत्याही परिस्थितीत होकारात्मक मन:स्थिती ठेवण्याची क्षमता म्हणजे सकारात्मक दृष्टीकोन. पण सकारात्मक दृष्टीकोन म्हणजे केवळ आनंदी असणे किंवा बरे वाटणे नव्हे, तर आपल्या मन:स्थितीवर नियंत्रण आणून त्याची आपण ज् या वेगवेगळ्या सामाजिक, आथिर्क, पर्यावरणीय आणि राजकीय सिस्टिम्समध्ये राहतो, त्याच्याशी योग्य सांगड घालणेही आहे. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यशस्वी व्हायचे असेल, तर चुकीच्या ठिकाणी नोकरी करणे किंवा आपले भवितव्य काही चांगले नाही, असा विचार करत घरात बसून राहणे म्हणजे आहे ती परिस्थितीही आणखी वाईट करणे ठरेल. नकारात्मक विचार करत आणि जगाला दोष देत बसलात, तर काहीच घडणार नाही. तुमच्या मनाची स्थिती तुमच्या शरीरालाही सांगेल, की तुम्ही अयशस्वी होणार आहात. पण मला यशस्वी व्हायचे तर मग काय करावे लागेल? सर्व विसरा, सकारात्मक विचार करा आणि नवी सुरुवात करा. सेल्स विभागातील एखाद्या कर्मचाऱ्याचा आपल्या कंपनीबाबत किंवा ब्रँडबाबतच नकारात्मक दृष्टीकोन असेल, तर कितीही उत्तम शैक्षणिक पात्रता असेल, तरी तो कर्मचारी आपले उत्पादन विकू शकणार नाही. तीच गोष्ट पचेर्स विभागातील कर्मचाऱ्याबाबत. त्याचा दृष्टीकोन नकारात्मक असेल, तर तो सप्लायरशी किमतीबाबत चांगली तडजोड करू शकणारच नाही. तुमची पार्श्वभूमी, ज्ञान, शिक्षण, कौशल्ये यापेक्षाही तुमचा दृष्टीकोन अधिक महत्त्वाचा असतो. आपण आपली पार्श्वभूमी, नाती, कुटुंब बदलू शकत नाही; पण आपण आपला दृष्टीकोन नक्कीच बदलू शकतो. ज्यांना आपल्या स्वप्नांवर विश्वास आहे आणि त्यासाठी सकारात्मक दृष्टी ठेवायची तयारी आहे, त्यांच्यासाठी सर्व काही उत्तमच होणार आहे. सकारात्मक दृष्टीकोनाशिवाय कोणतीही मोठी गोष्ट घडलेली नाही,

solved 5
General Knowledge Monday 10th Oct 2022 : 17:07 ( 1 year ago) 5 Answer 161 +22