समाजात नियमांची आवश्यकता का असते?www.marathihelp.com

समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली.
माणसातील कलागुणांचा विकास समाजामुळे होतो.
आपल्याला काही भावनिक आणि मानसिक गरजा ही असतात. 

समाजात कायमस्वरूपी व्यवस्था का निर्माण करावी लागते? 

समाजाचे अस्तित्व व्यवस्थेशिवाय अशक्य असते. अन्न-वस्त्र-निवारा, सुरक्षितता यासारख्या गरजा भागवण्यासाठी समाजाला एखादी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते; कारण या व्यवस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाहीत.

समाजव्यवस्था अस्तित्वात नसती तर कोणत्या अडचणी आल्या असत्या? 

समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी समाज व्यवस्थेची आवश्यकता असते. समाजाला लागणाऱ्या वस्तूंची निर्मिती या व्यवस्थेतून, व्यक्तींच्या श्रमातून आणि त्यांच्या कौशल्यामुळे निर्माण होत असते. परंतु अशी व्यवस्था नसती; तर समाजाचे दैनंदिन व्यवहार होण्यात मोठ्या अडचणी आल्या असत्या. प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला सर्व प्रकारची कामे करावी लागली असती. शेती, व्यवसाय, शिक्षण, मनोरंजन इत्यादी व्यवस्थांच्या अभावी आपल्या गरजा पूर्ण झाल्या नसत्या; त्यामुळे आपला विकास झाला नसता.

माणसाचे समाज जीवन अधिक संघटित व स्थिर कशामुळे होते?

समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते, याची जाणीव झाल्यावर माणूस संघटितपणे राहू लागला. पुढे समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली. त्यातूनच रूढी-परंपरा, नीतिमूल्ये, नियम आणि कायदे निर्माण झाले. त्यामुळे माणसाचे समाजजीवन अधिक संघटित व स्थिर झाले.

solved 5
अदालती Friday 28th Oct 2022 : 12:40 ( 1 year ago) 5 Answer 3140 +22