सूर्य किरण पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो?www.marathihelp.com

सूर्य किरणे सूर्यापासून पृथ्वीवर पोहोचायला साधारणपणे ८ मिनिट ते ८ मिनिटे ४० सेकंद वेळ लागतो.

सूर्य किरणे सूर्यापासून पृथ्वीवर पोहोचायला साधारणपणे ८ मिनिट ते ८ मिनिटे ४० सेकंद वेळ लागतो.

सूर्याचे पृथ्वीपासून अंतर - १५०,०००,००० किलोमीटर

प्रकाशाचा वेग - ३००,००० किलोमीटर / सेकंद

म्हणजे १५०,०००,००० किलोमीटर साठी लागणारा वेळ (१५०,०००,०००÷३००,००० = ५०० सेकंद म्हणजेच ८ मिनिट २० सेकंद)


प्रकाशाची निमिर्ती:

१. सूर्याच्या केंद्रात अतिप्रचंड दाब व तापमानामुळे (pressure and temperature) चार हायड्रोजन अणु एकत्र येऊन एक हिलियम अणु बनतो. या प्रक्रियेला न्यूक्लियर फ्युजन म्हणतात.

२. परंतु, या एका हिलियम अणुचे वस्तुमान हे त्या चार हायड्रोजन अणु च्या वस्तुमानापेक्षा कमी भरते.

३. हा वस्तुमानातील फरक (आईन्स्टाईन च्या प्रसिद्ध E=mc2 नुसार) ऊर्जेत रूपांतरित होतो व अनेक प्रकरच्या रेडिएशन च्या स्वरूपात बाहेर पडतो. यातील एक भाग म्हणजेच फोटॉन (प्रकाश कण )



प्रकाशाचे उत्सर्जन:

१. पण फोटॉन निर्माण होणे आणि सूर्यातून बाहेर पडणे या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

२. हा सूर्याच्या केंद्रात निर्मित झालेला हा फोटॉन सूर्याच्या केंद्रात इतस्ततः भटकत राहतो. इतर अणूंवर आदळतो, शोषला जातो, पुन्हा उत्सर्जित होतो. हळू हळू सूर्याच्या पृष्ठभागांच्या दिशेने चालू लागतो.

३. जो पर्यंत हा फोटॉन असा धडपडत आदळत आपटत सूर्याच्या पृष्ठभागां पर्यंत पोहोचतो तोपर्यंत साधारण ४०,००० ते १,००,००० वर्षांचा काळ लोटलेला असतो.




प्रकाशाचा प्रवास:

आता सोप्पं आहे. हा फोटॉन आता ३,००,००० किमी/सेकंद वेगाने सरळ रेषेत प्रवास करीत राहतो.

असा पृथ्वी च्या दिशेने येणार फोटॉन ५०० सेकंदात (८ मिनिटे २० सेकंद) आपल्यापर्यंत पोहोचतो.

फोटॉन च्या दृष्टिकोनातून:

आईन्स्टाईन च्या सापेक्षतेच्या सिद्धांतानुसार जस जसा वेग वाढतो, काळ मंदावतो (time dilation) व अंतर अखुडते (length contraction).

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 14:13 ( 1 year ago) 5 Answer 4120 +22