महाराष्ट्रातील पहिली महानगर पालिका कोणती आहे ?www.marathihelp.com

१८८८ साली स्थापन झालेली मुंबई महानगरपालिका (Bombay Municipal Corporation) ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका होय.

शहराच्या प्रशासनासाठी महानगरपालिकांची निर्मिती केली जोते. शहरामध्ये महानगरपालिका स्थापन करण्याचा किंवा नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर करण्याचा अधिकार हा राज्य शासनास आहे. मुंबई महानगरपालिका कायदा १८८८ साली करण्यात आला. १८८८ साली स्थापन झालेली मुंबई महानगरपालिका (Bombay Municipal Corporation) ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका होय. स्वातंत्र्योत्तर काळात १९४७ साली केवळ मद्रास, कलकत्ता आणि मुंबई ह्या शहरांसाठीच महानगरपालिका होत्या. [२] नागरी लोकसंख्येच्या आधारे महानगरपालिकांची चार गटांत विभागणी केली जाते. [१] एक कोटी लोकसंख्येची शहरे 'अ+ (A+)' श्रेणीत त्यानंतर अ(A) ते ड (D) श्रेणीपर्यंत वर्गीकृत करण्यात येते. या यादीत 'अ+' ग्रेड असलेली एकमेव बृहन्मुंबई महानगरपालिका आहे. जून २०२२ रोजी महाराष्ट्रात एकूण २८ महानगरपालिका आहेत. इचलकरंजी महानगरपालिका ह्या नवीन महानगरपालिकेची २०२२ मध्ये घोषणा करण्यात आली.

solved 5
General Knowledge Thursday 20th Oct 2022 : 13:16 ( 1 year ago) 5 Answer 1687 +22