स्त्रीवादी इतिहास म्हणजे काय?www.marathihelp.com

स्त्रीवादी इतिहासलेखन

स्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्रीयांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय.[१] इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचाच प्रभाव अधिक होता.म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा, अशी भूमिका फ्रेंच विदुषी सीमा - द - बोव्हा हिने मांडली. त्यानंतर स्त्रीवादी इतिहासलेखन हा विचार स्वीकारला गेला. स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन,स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, स्रीयांसाठी काम करणाऱ्या संस्था या सर्वांवर सविस्तर संशोधन सुरू झाले.इ.स. १९९० नंतर स्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला.

solved 5
ऐतिहासिक Wednesday 7th Dec 2022 : 12:12 ( 1 year ago) 5 Answer 5654 +22